नागपूर: पावसाळ्यात सोने- चांदीच्या मागणीत घट होत असतांनाच सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे या काळात सोने- चांदीचे दागिने खरेदीचा बेत रचलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान गुरूवारी (२४ जुलै २०२४) सराफा बाजार उघडल्यावर सोने- चांदीचे दर काय होते? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
सोन्याचे दर १३ जूनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून एक लाखावर गेले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु त्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून सातत्याने सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम एक लाखाहून जास्तवर होते. सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचल्यावर ग्राहकांमध्ये चिंता असतांनाच गुरूवारी सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सराफा बाजारात २३ जुलै २०२५ रोजी पावसाळ्याच्या दिवसांत सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७८ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार ६०० रुपये होते.
हे दर दुसऱ्याच दिवशी २४ जूलैला दुपारी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २३ जुलैच्या तुलनेत २४ जुलैला सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति १० ग्राम १ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार १०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ९०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे. हे दर येत्या काळात वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून दिले जात आहे. त्यामुळे आता सोने- चांदीतील गुंतवणूक लाभदायक असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.
चांदीच्या दरातही घसरण…
नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो २३ जुलैला १ लाख १६ हजार ७०० रुपये होते. हे दर २४ जुलैला प्रति किलो १ लाख १५ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात २३ जुलैच्या तुलनेत २४ जुलैला १ हजार २०० रुपये प्रति किलोने दर घसरल्याचे दिसत आहे.