नागपूर : पाकिस्तानवरुन नागपुरात ‘शॉर्ट व्हिसा’वर आलेले सर्वच पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला परतले असून आजस्थितीली एकाही पाकिस्तानी नागरिक नागपुरात नाही, अशी माहिती अशी पोलीस सूत्रांनी दिली.

हा विषय अतिशय संवेदनशील आणि सुरक्षेसंबधी निगडित असल्याने या प्रकरणाविषयी अतिशय गोपनियता पाळण्यात आली.

पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याने २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या पृष्ठभूमीवर संरक्षणविषयक केंद्रीय समितीच्या (सीसीएस) बैठकीत व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. जे वैद्यकीय व्हिसावर होते, त्यांना मानवीय दृष्टिकोनातून विचार करीत दोन दिवस अतिरिक्त देण्यात आले होते. २९ एप्रिलच्या रात्री १२ वाजता ही मुदत संपली होती.

दरम्यान या संवेदनशील विषयावर गुप्तचर खात्याच्या आयुक्तांनी दृकश्राव्य माध्यमातून राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांची बैठक घेतली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी युध्दपातळीवर तपासणी आणि कारवाई पूर्ण करून व्हिसावर आलेल्या नागरिकांना पाकिस्तानात परत पाठविण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात अतिशय गोपनियता पाळण्यात आली.

जवळपास दोन हजार पाकिस्तानी नागरिकांनी नागरिकांकडे ‘लाँग टर्म व्हिसा’ आहे. त्यावर असलेले भारतीय नागरिकत्व मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. ज्यांना नेहमीच भारतात ये-जा करावी लागते, अशा विशेष लोकांना ‘सार्क व्हिसा’ देण्यात येतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी, ‘व्हिजिटर’,”कॉन्फरन्स (संमेलन), पत्रकार, ‘ट्रांझिट व्हिसा’, चित्रपट (कलावंत), विद्यार्थी, ग्रुप टूरिस्ट व्हिसा, तीर्थयात्रा, ट्रेकींग आणि वैद्यकीय असे ‘व्हिसा’चे प्रकार आहे. यापैकी भारतात मेडिकल व्हिसावर येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, सध्या नागपुरात एकही पाकिस्तानी नागरिक नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांची तत्परता पहलगाम येथे पर्यटकांवरील हल्ल्यानंतर ४८ तासांच्या आत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला होता. त्यामुळे भारतात व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेणे तसेच त्यांच्यापर्यंत देश सोडून जाण्याची माहिती पोहचवणे आणि त्यांच्यावर देशाबाहेर जाईपर्यंत लक्ष ठेवणे या सर्व बाबींमुळे पोलिसांवर ताण आला होता. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवून प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांची माहिती अपडेट केली. त्यांना पाकिस्तानी परत जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाकिस्तानी नागरिकांना शांततेत आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर होती. पोलिसांनी ती तत्परतेने पार पाडली.