नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ आणि फोटो होते ते अमित शाहूने बघितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून अमितने सना यांच्या डोक्यात रॉड घालून खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

सना खान यांचे पहिले लग्न झाले होते. त्यांना १२ वर्षांचा मुलगा आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्या भाजपामध्ये सक्रिय झाल्या. या दरम्यान त्यांचा लोकसंपर्क वाढला. त्यांचे अनेकांसोबत छायाचित्रे, व्हिडीओ होते. काही मित्र, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्रे आणि व्हिडीओ सना यांनी मोबाईलमध्ये जतन करून ठेवले होते. दरम्यान, सना यांची अमित शाहू याच्याशी ओळख झाली. त्याचे सनाच्या घरी येणे-जाणे वाढले. सना यांच्या कुटुंबियांचा विरोध झुगारून त्यांनी प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

हेही वाचा – १४ दिवसांनंतर अखेर भाजपा नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडला

हेही वाचा – पाऊस लांबल्याने राज्यात वीजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर, कारण काय पहा

२ ऑगस्टला अमितने सना यांच्या मोबाईलमधील व्हिडीओ आणि फोटो बघितल्याने तो संतापला. त्याने सना यांना विचारणा केली. तिने काही वर्षांपूर्वीचे मित्र-मैत्रिणी असल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र, अमितचा राग अनावर झाल्याने त्याने सना यांच्या डोक्यात रॉड घालून खून केला व मृतदेह हिरन नदीत फेकला. पोलिसांना १६ ऑगस्टला तो सापडला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.