वर्धा : दोन मित्रांनी कट रचून मैत्रिणीच्या घरातील आठ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उजेडात आली आहे. हिंगणघाट पोलिसांकडे वृषाली रमेश सूरकार यांनी घरफोडीत ७ लाख ८८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार केली होती. चार दिवसानंतर त्याचा छडा लागला असून सचिन अशोक पाराशर व अनिकेत अरुण लासाटवार यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यापैकी सचिन हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्रच निघाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर : महामेट्रोच्या अधिकारी भरती घोटाळ्याची चौकशी करा, अजित पवार गटाची मागणी

हेही वाचा – ‘अँटीमायक्रोबिल रेझिस्टन्स’चा मानवासह प्राणी, वनस्पतींनाही धोका, इंडियन मेडिकल असोसिएशनचा दावा

मुख्य आरोपी सचिन याने वृषाली सूरकार यांच्या कुटुंबास स्वतः पार्टी देतो म्हणून हॉटेलात जेवायला नेले. त्याला घरातील इत्थंभूत माहिती होतीच. तो सर्वांना बाहेर घेवून गेल्यावर त्याने त्याचा मित्र अनिकेतला घरात रोख व दागिणे कुठे ठेवून आहे, याची माहिती दिली. अनिकेतने घराचे कुलूप तोडून सर्व रक्कम व दागिणे लंपास केले. नंतर दोघांनीही रक्कम वाटून घेतली. त्यांच्याकडून ५ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was an incident where two friends stole money from a friend house pmd 64 ssb
First published on: 22-11-2023 at 13:25 IST