नागपूर : भारतीय सैन्यदलातील ब्रिगेडिअर आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना एक समान गणवेश १ ऑगस्टपासून दिला जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सेवाविषयक बाबींमध्ये समान ओळख आणि दृष्टीकोन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलामुळे रेजिमेंट, कोर, शस्त्र यावर आधारित वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख पुसली जाणार आहे.

संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह म्हणाले, सैन्यदलातील तोफखाना, पायदळ किंवा विविध सेवांच्या प्रकारावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शोल्डर रँक बॅज, गॉर्जेट पॅच (कॉलरवर परिधान केलेले), वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बेल्ट आणि शूज वेगवेगळे आहेत. लष्कराने यामध्ये समानता आणण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिगेडिअर आणि त्यावरील दर्जाचे अधिकारी १ ऑगस्टपासून कोणतीही दोरी घालणार नाहीत.

हेही वाचा – “…त्यापेक्षा आत्महत्या करणं चांगलं”; नागपुरात लेस्बियन विद्यार्थिनीने संपवलं जीवन, सुसाईड नोटमधून मोठा खुलासा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत विविध प्रकारचे गणवेश आणि वेशभूषा लष्करातील संबंधित शस्त्रे, रेजिमेंट आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. हा बदल केवळ ब्रिगेडिअर आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशाबाबत आहे. कर्नल आणि त्याखालील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात कोणताही बदल होणार नाही.

हेही वाचा – रंगभूमी परीनिरीक्षण मंडळावर विदर्भातून ११ सदस्यांची नियुक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोरी होणार हद्दपार

या बदलामुळे अधिकारी पायदळ, तोफखाना, चिलखत आदी पैकी कोणत्याचा विभागाचा आहे. कोणत्या रेजिमेंटचा आहे हे कळू शकणार नाही. वेगवेगळ्या विभागाचे, वेगवेळ्या सेवांचे अधिकारी एकसमान गणवेश परिधान करतील. सध्या वरिष्ठ अधिकारी वेगवेगळ्या (पिवळा, नळा) रंग असलेली दोरी घालतात. यापुढे ब्रिगेडिअर आणि त्यावरील दर्जाचे अधिकारी डोरी घालणार नाहीत.