लोकसत्ता टीम

चंद्रपूर : शिक्षण व नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करू नका, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो तरुणांनी एकत्र येत राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी तरुण बेरोजगारांनी धरणे आंदोलन केले.

Jai Bhim Nagar, huts in Jai Bhim Nagar,
मुंबई : जयभीमनगर प्रकरण; झोपड्यांवर कारवाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
High Court asked the state if there's evidence against Saurabh Tripathi and Ashutosh Mishra
अंगाडिया खंडणी प्रकरण : IPS अधिकरी सौरभ त्रिपाठींविरोधात पुरावे आहेत का? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
mcoca action against NK gang leader and accomplices in Yerwada
येरवड्यातील एन.के. गँगच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
Satyashodhan Committee, High Court slams central government, amendment of law,
केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचा तडाखा, सत्यशोधन समिती स्थापन करण्याबाबतची कायदादुरूस्ती घटनाबाह्य ठरवून रद्द
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

शिक्षण व नोकरी बचाव समितीच्या वतीने सरकारने काढलेल्या खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात धरणे, निदर्शने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलनाला साडेबारा वाजेपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो तरुण तथा विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांनी, विद्यार्थ्यांनी कंत्राटीकरणाच्या विरोधातील त्यांचा राग, रोष तीव्र शब्दात व्यक्त केला. सरकारने कंत्राटीकरण व शाळांच्या खासगीकरणाचा घेतलेला निर्णय हा किती अन्यायकारक आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : खाटा कमी, रुग्णसंख्या अधिक!

या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कंत्राटीकरण व खासगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास येणाऱ्या पंधरा दिवसानंतर एक मोठा आक्रोश मोर्चा विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात येईल, अशा पद्धतीचा निर्णय या धरणे आंदोलनात घेण्यात आला. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

अशा आहेत मागण्या

१ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीवर लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, विद्यार्थी हितासाठी वीस पटाखालील शाळा बंद होऊ नये यासाठी शाळा संकल्पना रद्द करावी, राज्यातील विविध कार्यालयात रिक्त असलेली तथा शिक्षक व प्राध्यापकांची पदे तात्काळ भरावी, शासनाने स्पर्धा परीक्षा शुल्काच्या नावाखाली हजारो रुपयांची सुरू केलेली वसुली तात्काळ थांबून स्पर्धा परीक्षेचे शुल्क १०० रुपये करण्यात यावे, तलाठी पदभरती तसेच विविध पदभरती होणाऱ्या पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी कडक असा कायदा करण्यात यावा, इत्यादी मागण्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून वाचा फोडली.