ISS International Space Research Station अकोला : आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानकाचा थरार आज, ८ मेपासून सलग तीन दिवस अनुभवता येणार आहे. अवकाशात या अंतराळ संशोधन स्थानकाचे दर्शन होणार असून खगोल प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरेल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानक हे पृथ्वीभोवती फिरणारे एक मोठे अंतराळ स्थानक असून हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे. अंतराळवीरांसाठी निवासस्थान आणि संशोधन प्रयोगशाळा म्हणून काम करणारे हे स्थानक अंतराळात पाठवलेले सर्वात मोठे स्थानक आहे.भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचे अंतराळ संशोधन स्थानकावर केवळ एका आठवड्यासाठी अभ्यास व संशोधनासाठी जाण्याचे नियोजन होते. मात्र, त्यांच्या स्टार लायनर या यानात तांत्रिक अडचणींमुळे त्यांना साडेनऊ महिने अंतराळ स्थानकात थांबावे लागले. अंतराळवीर विविध प्रकारच्या अभ्यास व संशोधनासाठी अंतराळ स्थानकात असतात. पृथ्वीवर परतल्यानंतर येथे ठराविक कालावधीपर्यंत त्यांचेवर विविध उपचार करून त्यांचे सुरळीत जीवन सुरू होते.

आकाशातील महाकाय आकाराचे हे अंतरा संशोधन स्थानक जगातील सर्वात महाग वास्तू असून त्याची उभारणी अनेक टप्प्यात केली जाते. सुमारे ४६० टन वजन व या ठिकाणी शून्य गुरुत्वाकर्षण असल्याने ते हवेत तरंगते. दरताशी सुमारे २८ हजार किलोमीटर वेगाने हे एक पृथ्वी प्रदक्षिणा दीड तासात या प्रमाणे रोज पंधरा ते सोळा वेळा पृथ्वी भोवती फिरते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे अंतराळ स्थानक एखाद्या ठळक चांदणीच्या स्वरूपात ८, ९ आणि १० मे रोजी नुसत्या डोळ्यांनी सहजपणे बघता येईल. सध्या दिवसा चढणारा उष्णतेचा पारा संध्याकाळी सात नंतर सुटणारा वारा दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी मदतीचा ठरतो. अंतराळ संशोधन केंद्र आपल्यापासून सुमारे चारशे कि. मी. अंतरावरून फिरतांना आपल्या भागातून जाते तेव्हा ते निरभ्र आकाशात चांगल्या प्रकारे बघता येईल. ८ मे, गुरुवारी रात्री ८.०९ ते ८.१५ या वेळी नैऋत्ये कडून वायव्य दिशेला जातांना ८.११ वाजता मंगळ ग्रहा जवळून जाईल. दि.९ ला रात्री ७.२१ ते ७.२७ या वेळी नैऋत्य ते ईशान्य दिशेला चंद्र व मंगळ यांच्यामधून जाणार आहे. दि.१० ला शनिवारी पहाटे ५.११ ते ५.१८ या वेळेस वायव्य ते आग्नेय दिशेला बघता येईल. या अनोख्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी केले आहे.