बुलढाणा : खामगाव – मेहकर मार्गावर देऊळगाव साकर्शा गावाजवळ दोन चारचाकी आणि एक दुचाकीच्या विचित्र अपघातात तीनजण ठार तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.
शनिवारी रात्री उशिरा झालेल्या या तिहेरी दुर्घटनेत देऊळगाव साकर्शा येथील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून मेहकर तालुका हादरला आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : भाजपामध्येही बदलाचे वारे, प्रदेश महामंत्र्यांनी घेतला आढावा
वीटभट्टी परिसरात भरधाव दुचाकीने आधी इर्टिका कारला धडक दिली. यामुळे अनियंत्रित झालेली दुचाकी ‘पिकअप’ वर आदळली. यात दोन्ही वाहने अनियंत्रित होऊन एकमेकांवर आदळली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा – किळसवाणे! प्रेयसीच्या मुलीवरच नराधमाचा बलात्कार
शेख इरफान शेख हुसेन, सचिन सुभाषचंद्र नहार, लक्ष्मण गवळी (राहणार देऊळगाव साकर्शा, तालुका मेहकर) अशी मृताची नावे आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एजाज दिलावर पठाण याला अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इर्टिका कारमधील चौघांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.