चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या पाथरी उपवन क्षेत्रातील असोलामेंढा नहराला लागून असलेल्या शेतात निंदण करीत असलेल्या पांडुरंग भिकाजी चचाने या शेतकऱ्याला वाघाने शेतातून उचलून नेऊन ठार केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना समोर येताच गावात भीती व दहशतीचे वातावरण आहे.

पाथरी या गावातील पांडुरंग भिकाजी चचाने हा शेतकरी विरखल मार्गालगत लगत असोलामेंढा नहराला लागून असलेल्या शेतात गुरुवार ४ ऑगस्ट चे सकाळी निंदनचे काम करीत होता. त्याच दरम्यान तिथे वाघाने आला आणि शेतकऱ्याला उचलून नेऊन ठार केल्याची खळबळ जनक घटना घडलेली आहे. या घटनेची माहिती वन परिक्षेत्र विभागाला व पोलीस विभागाला देण्यात आलेली आहे.

याच परिसरात वाघिणीने नुकताच पिलांना जन्म दिल्याची माहिती मिळत असून विरखल परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.