दक्षिण मध्य रेल्वेच्या दिल्ली ते चेन्नई रेल्वे मार्गावर राजुरापासून आठ किलोमीटर अंतरावरील चनाखा गावाशेजारी रेल्वेने धडक दिल्याने एका वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना रात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू , उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी निलोत्पल यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चुनाळा वनक्षेत्र परिसरातून रेल्वे मार्ग गेला आहे. आज सकाळी रेल्वे गँगमन गस्त घालीत असताना त्याला रेल्वे रुळाशेजारी वाघीण मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रेल्वे विभागाने राजुरा वन विभागाला कळविले. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड आणि क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत वाघिणीचे वय अंदाजे चार ते साडेचार वर्ष असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.