लोकसत्ता टीम

नागपूर : जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात आजपासून पर्यटनाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात तीन महिने गाभा क्षेत्रातील पर्यटन बंद होते. त्यानंतर आज मोहर्ली, खुंटवडा, नवेगाव, कोलारा, झरी व पांगडी प्रवेश द्वार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.

ताडोबात व्याघ्र दर्शनासाठी आलेल्या देशविदेशातील पर्यटक व वन्यजीव प्रेमींची प्रवेशद्वारावर गर्दी दिसून येत होती. यावेळी पर्यटनासाठी आलेल्या सर्व पर्यटकांचे स्वागत प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी गुलाबाचे फुल देऊन केले. ताडोबातील जंगल पर्यटनाची वेळ सकाळी ६ ते १० व दुपारी २ ते ६ अशी राहील.

आणखी वाचा-गडचिरोली पोलिसांचा तस्करांना दणका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, उपसंचालक सचिन सिंदे, सहाय्यक वनसंरक्षक मिसाळ, मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड, क्षेत्र सहायक विलास सोयम, क्षेत्र सहाय्यक आगरझरी एस.आर. घागरगुंडे वनरक्षक एस. डी. मरस्कोले, एम. ए. अंसारी, एस. डी. वाटेकर, आर. डी. वानखेडे, स्नेहा महाजन यांच्यासह मोहर्ली प्रवेशद्वारचे पर्यटक मार्गदर्शक, जिप्सी चालक, होमस्टे मालक आणि रिसॉर्ट मालक संजय ढिमोले, शुभम ढिमोले, श्रीकांत अरवल, धंनजय बापट उपस्थित होते. ताडोबा अंधारी टाइगर रिजर्वचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांनी मोहर्ली प्रवेशद्वारावर फित कापून आणि मोहर्लीचे संचालक संजय ढिमोले यांनी हिरवा झेंडा दाखवून पर्यटकांना रवाना केले.