लोकसत्ता टीम

नागपूर : जी-२० परिषदेअंतर्गत सिव्हील सोसायटी अर्थात सी-२० च्या प्रारंभिक परिषदेचे आयोजन शहरात २० ते २१ मार्च दरम्यान  करण्यात आले आहे. यानिमित्त बैठकीला येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांचे स्वागत भारतीय परंपरेनुसार करण्याचे नियोजन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

असे होणार पाहुण्यांचे स्वागत

सी-20 परिषदेत सहभागी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समिती स्थापन केली आहे. ही समिती पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करेल. विमानतळावर पाहुण्यांसाठी विशेष स्वागत कक्ष उभारण्यात येणार आहे. स्वागत कक्षात भारतीय परंपरेनुसार पाहुण्यांना फेटा बांधण्यात येईल तसेच महिलांना नऊवारी साडी नेसवून मेहंदी लावण्यात येईल. पाहुण्यांना टिळा लावून ओवळण्यात येईल व सेवाग्राम येथील सूतमाला घालून त्यांचे स्वागत करण्यात येईल. यावेळी स्वागत शहनाईचे वादन देखील करण्यात येणार आहे. पाहुण्यांना विमानतळ ते वाहनापर्यंत विद्यार्थ्यांची टिम नृत्य  करत घेऊन जाईल. तसेच नियोजित राहण्याच्या ठिकाणी पोहचल्यावर हॉटेलच्या गेटपासून आतपर्यंत विद्यार्थ्यांची लेझीम टीम त्यांना वाजतगाजत घेऊन जाणार आहे.

आणखी वाचा- विश्लेषण: नागपूरला होणाऱ्या सी-२० बैठकीचे महत्त्व काय?

संपर्क अधिकारी नेमणार

येणाऱ्या पाहुण्यांना कोणतीही अडचण जावू नये यासाठी विमानतळावर विशेष मदत केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. पाहुण्यांसाठी प्रत्येक देशनिहाय संपर्क अधिकारी नेमण्यात येणार असून भाषेची अडचण होऊ नये म्हणून विद्यापीठाचे विद्यार्थी त्यांचेसोबत राहून दुभाषकाचे काम करतील.

आणखी वाचा- राज्यभरात मुलींना अनुभवावा लागतोय वाईट स्पर्श; ‘वूई फॉर चेंज’चे धक्कादायक सर्वेक्षण, वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय विमानतळावर त्यांचे सामान वहनासाळी विशेष व्यवस्था राहील. आकस्मिक सेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम, रुग्णवाहिका, अग्नीरोधक यंत्रणा तसेच अतिरिक्त वाहतूक सेवा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.