नागपूरमध्ये जामठी मैदानावर सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन नागपूरमध्ये येणारी प्रमुख मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवल्याने बुटीबोरीजवळ शुक्रवारी दुपारनंतर वाहनकोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रागा बुटीबोरीजवळ पाहायला मिळाल्या.

हेही वाचा >>>नागपूर: ‘त्या’ मुलीचा अपघात कि घातपात, पाच वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू

गुरुवारपासून नागपूरमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट कसोटी सामन्याला सुरूवात झाली. सामना बघण्यासाठी जाणाऱ्या हजारो प्रेक्षकांमुळे वाहतूक खोळंबू नये म्हणून वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातून नागपूरमध्ये येणाऱ्या वाहनांचा तसेच भंडारा, जबलपूरकडून वर्धा, चंद्रपूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आला. पहिल्या दिवशी वाहतूक सुरळीत होती. परंतु शुक्रवारी बुटीबोरीजवळ वाहनकोंडी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

हेही वाचा >>>तरुंगातून सुटका झाल्यावर अनिल देशमुख प्रथमच उद्या नागपुरातील घरी परतणार, सर्वप्रथम ‘येथे’ जाणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहनकोंडीची शक्यता लक्षात घेता शहरातील प्रवाशांसाठी मेट्रोने विशेष सेवा सुरू केली आहे. खापरी व न्यू एअरपोर्ट या मेट्रोस्थानकापासून जामठा मैदानापर्यंत जाण्यासाठी महेट्रोने ई-रिक्षाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे ही कोंडी झाली आहे.