अमरावती : यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्‍वर नजीक शिंगणापूर येथे सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण गंभीररीत्‍या जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला. जखमींवर येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरूण अमरावतीहून यवतमाळ येथे एका क्रिकेट स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी जात होते.

श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबर्ते, संदेश पाडर अशी मृत तरूणांची नावे आहेत. येथील रुक्मिणी नगर आणि रवी नगर परिसरात राहणारे १४ ते १५ तरूण यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट सामन्‍यासाठी टेम्‍पो ट्रॅव्‍हलरने जात होते. सकाळी नऊ वाजताच्‍या सुमारास शिंगणापूर फाट्यानजीक एका भरधाव सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्हलरला धडक दिली. अपघातात चार तरूणांना जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण जखमी झाले.

हेही वाचा…विद्यावेतनाच्या मागणीवरून कामबंद! एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर दुसऱ्या दिवशीही संपावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींना नांदगाव खंडेश्‍वर येथील रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍यातील पाच गंभीर जखमींना अमरावती येथील रुग्‍णालयात हलविण्‍यात आले.