scorecardresearch

नागपूर : दुचाकीने जात असताना अचानक अंगावर कोसळले झाड…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाऊस किंवा वादळामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

tree fell on body while riding a bike nagpur
नागपूर : दुचाकीने जात असताना अचानक अंगावर कोसळले झाड…

बोले पेट्रोल पंप चौकाकडून राजाराणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील गुलमोहराचे झाड कोसल्यामुळे त्यात दिलीप रामचंद्र जारोडे (५९) याचा मृत्यू झाला.हुडकेश्वर परिसरात राहणारे दिलीप जारोडे सकाळी साडे अकराच्या सुमारास दुचाकीने बोले पेट्रोल पंपाकडून राजाराणी चौकाकडे जात असताना वाटेत रिझर्व्ह बँक क्वार्टरसमोरील एक मोठे गुलमोहोरचे झाड जारोडे यांच्या अंगावर पडले. त्यात जारोडे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

हेही वाचा : स्कूलबस चालकाकडून नियमांची पायमल्ली ; नऊ सिटर वाहनात कोंबले ३१ विद्यार्थी, डिक्कीतही…

लोकांनी झाड बाजूला करून त्यांना तातडीने सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्या भागातील वाहतूक बंद केली.अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरून झाड बाजूला केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाऊस किंवा वादळामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जीर्ण झाडाची तपासणी करण्याचे आदेश महापालिकेने उद्यान विभागाला दिले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-10-2022 at 10:20 IST