बुलढाणा: समृद्धी महामार्गावर ट्रकने पेट घेतल्याने वाहनाचा केवळ सांगाडाच उरला. मात्र चालकाने बाहेर उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला.जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मेहकर पासून दहा किलोमीटर अंतरावर गुरुवारी मध्यरात्री नंतर ही दुर्घटना घडली.
नागपूरकडे भरवेगात जाणाऱ्या( एमएच १६ सीसी ८७३० क्रमाकाच्या) आयशर चे समोरील टायर फुटले. यामुळे अनियंत्रित झालेल्या वाहनाने पेट घेतला. वाहन रसायनसदृश्य पदार्थ घेऊन जात असल्याने आग जास्तच भडकली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझली खरी ,पण वाहनाचा केवळ सांगाडाच उरला आहे. दरम्यान, टायर फुटण्याचा आवाज येताच चालक सचिन लक्ष्मण खेडकर( राहणार शिवगाव, जिल्हा अहमदनगर) याने बाहेर उडी मारल्याने तो सुखरुप बचावला.