यवतमाळ : पांढरकवडाकडे वृत्तपत्राचे पार्सल घेऊन जाणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिली. आज, मंगळवारी सकाळी करंजी-वणी मार्गावरील कोठोडानजीक घडलेल्या या दुर्घटनेत तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. कारचालक किशोर बोरकर रा. आनंद चौक, वरोरा, जि. चंद्रपूर, असे मृताचे नाव आहे.

नागपूरवरून मराठी दैनिक वृत्तपत्राचे पार्सल घेऊन येणारी ओमनी कार (क्र. एमएच ३४, के १९५४) आज सकाळी मारेगाव येथून पांढरकवडाकडे रवाना झाली. राज्य महामार्गावरील कोठोडा पुलाजवळ समोरून येत असलेल्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत कारचालक, वाहक व दोन प्रवाशांपैकी एकजण असे तिघे जण जागीच ठार झाले. एक प्रवासी गंभीर जखमी आहे. दरम्यान, भीषण अपघात होताच ट्रकसह चालक घटनास्थळावरून पसार झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रकने दिलेल्या जबर धडकेत कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचुर झाला. तिघांचेही मृतदेह कारमध्ये फसलेले आहेत. पांढरकवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गॅस कटरच्या साह्याने कारमधून मृतांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.