भंडारा : क्रिप्टो चलनात गुंतवणूक केल्यास चार पटीने लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २ लाख ६० हजारांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी ब्रिजेश यशवंत दोहरे ( ३५, रा. गोंदिया) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.भंडारा येथील पटेलपुरा वार्डात राहणारे अजय जगदीश गडकरी (४६) यांच्या सोबत ब्रिजेश डोहरे याने भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना भंडारा येथील हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलावले आणि ‘बिगबुल’ क्रिप्टो चलनाबाबत अजय यांना माहिती दिली.

सध्या ‘बिगबुल’ क्रिप्टो चलनाचा दर ७० रुपये असून मी तुम्हाला १.५ पैसे अशा परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देतो, असे सांगितले. यामध्ये काही महिन्यांत चार पटीने नफा कमावण्याचे आमिषही दाखवले. या अमिषाला बळी पडत गडकरी यांनी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेले २ लाख ५९ हजार ५०० रुपये तीन महिन्यांत वेगवेगळ्या खात्यात जमा केले.

हेही वाचा : बुलढाणा : माजी सरपंच ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला, अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यानंतर या रकमेबाबत विचारले असता, ब्रिजेशने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे गडकरी यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ब्रिजेश डोहरे याच्याविरुद्ध भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.