खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गुमगाव खदान गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील डीजे बंद करण्यावरून पोलीस आणि नागरिकांमध्ये वाद झाला. या वादातून पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याने मिरवणुकीत लाठीमार केला. त्यात एक युवक जखमी झाला. वाद चिघळू नये म्हणून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गावाला भेट देऊन लाठीमार करणाऱ्या दोन्ही पोलिसांना निलंबित केले. त्यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. मात्र, या घटनेमुळे गुमगावात तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा >>> “लोकशाहीसाठी भाजप व संघ धोकादायक,” संभाजी ब्रिगेडची टीका; महाविकास आघाडीला पाठिंबा

Nagpur, IPS, wife,
नागपूर : आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढणे पडले महागात
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
MP: Youths Thrash Traffic Cop Publicly After Police Stop Their Bullet
बुलेट थांबवली म्हणून वाहतूक पोलिसालाच लगावली कानशिलात; मात्र शेवट असा झाला की…VIDEO पाहून व्हाल अवाक्
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
amit shah
“भाजपा निवडणुकीत जिंकली तर आम्ही…”, मुस्लीम आरक्षणावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य

खापा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुमगाव खदान येथे १४ एप्रिलला रात्रीच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेवर बंदी आहे. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम आणि कर्मचारी गणेश बघनुरे यांनी डीजे बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, मिरवणुकीतील काही युवकांनी त्यांना विरोध केला. यातून पोलीस आणि नागरिकांमध्ये वाद झाला. पोलीस उपनिरीक्षक गेडाम आणि बघनुरे यांनी डीजे बंद करण्यासाठी बळाचा वापर केला. पोलिसांच्या मारहाणीत एक युवक जखमी झाला. त्यामुळे मिरवणुकीतील नागरिक चिडले. त्यांनी पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केला. त्यामुळे गुमगावातील परिस्थिती चिघळली. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गावाला भेट देऊन  नागरिकांशी संवाद साधला. पोलीस उपनिरीक्षक गेडाम आणि शिपाई बघनुरे यांना निलंबित केले. अप्पर अधीक्षक रमेश धुमाळ यांना दोघांच्याही प्राथमिक चौकशीचे आदेश दिले.

तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करू

युवकाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निबंनाची कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  कुणीही दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न समाज माध्यमातून केल्यास  गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा  पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला आहे.