नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची शान असलेला बजरंग नावाचा वाघ आणि छोटा मटका नावाचा वाघ यांच्यात मंगळवारी जोरदार झुंज झाली. या दोघांमधील थरकाप उडवणाऱ्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे.बजरंग हा वाघ म्हणजे धिप्पाड शरीरयष्टीचा. आजवर झालेल्या झुंजीत तो कधी पराभूत झाला नाही. याउलट त्याने आपले साम्राज्य निर्माण केले. तर मोठा मटका या वाघाचा मुलगा असलेल्या छोट्या मटक्याने ताडोबाच्या बफर क्षेत्रात म्हणजेच नीमढेला क्षेत्रात आपले साम्राज्य उभारले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2023 रोजी प्रकाशित
VIDEO: दोन वाघांच्या झुंजीचा थरार; व्हिडीओ आला समोर…
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची शान असलेला बजरंग नावाचा वाघ आणि छोटा मटका नावाचा वाघ यांच्यात मंगळवारी जोरदार झुंज झाली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-11-2023 at 15:52 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two tigers fight fiercely in tadoba andhari tiger project in nagpur rgc 76 amy