भंडारा : शेतात काम करीत असताना अचानक वीज पडल्याने दोन शेत मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना वाघबोडी येथे आज २६ जून रोजी दुपारी घडली. यादवराव अर्जुन शहारे वय ६५ वर्ष रा. विद्यानगर भंडारा आणि रमेश श्रावण अंबादे, वय ५२वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील तेजराम बडोले यांच्या शेतात काम करण्यासाठी दोघे गेले होते. शेतात काम करीत असतानाच वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला.