नागपूर : धरमपेठच्या पायरेट्स पबमध्ये सोमवारी मध्यरात्री तरुणींकडे बघून नृत्य करीत असताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणातून चार तरुणांनी गोंधळ घालत दोघांना बेदम मारहाण केली. डोक्यावर बिअरची बाटली फोडून जखमी केले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा >>> गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘प्रहार’च्‍या सभेला परवानगी नाकारली; अखेर जिल्हा परिषदेने…

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Prakash Ambedkar Slams PM Modi
पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून १७ लाख कुटुंबांनी देश सोडला, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाने खळबळ
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
drunk farmer beaten up and robbed by two prostitute
नागपूर : मौजमस्ती करण्यासाठी शेतकरी गंगाजमुनात गेला, पुढे झाले असे की…
What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Police
अल्पवयीन मेहुणीशी लग्न, पोलिसांनी दोघांनाही टाकलं तुरुंगात; कोठडीत मृतदेह आढळल्याने खळबळ, गावकरी म्हणतात…

मिर्झा अस्लान फहीम बेग (२३) रा. महाल आणि ओम कथले अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बॉबी उर्फ प्रशांत धोटे (३६) रा. ओमनगर, पीयूष उर्फ ऋषीकेश वाघमारे (२४) रा. रेशीमबाग, रॉकी जाधव (३५) व श्रेयांश शाहू (२२) दोन्ही रा. जुनी शुक्रवारी, अशी आरोपींची नावे आहेत.

मिर्झा आणि ओम त्यांच्या दोन मित्रांसोबत पबमध्ये पार्टी करीत होते. त्यांच्या शेजारीच बॉबी, पीयूष, रॉकी व श्रेयांश हे चौघेही पार्टी करीत होते. या दरम्यान रॉकीचा अस्लानला धक्का लागला. याचा जाब विचारला असता रॉकी संतापला व त्याने अस्लानला शिवीगाळ सुरू केली. त्याच वेळी रॉकीने बिअरची बाटली अस्लानच्या डोक्यावर मारली. ओम अस्लानच्या मदतीला आला असता आरोपींनी त्यालाही मारहाण केली.