नागपूर : महाराष्ट्रातील राजकारणावर सडकून टिका होत असतानाच शुक्रवारी नागपूरात आयोजित एका कार्यक्रमात अतिशय भावूक क्षण पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातील एका उड्डाणपूलाला काँग्रेस पक्षातील एका दिवंगत नेत्याचे नाव देऊन संवेदनशिलतेचा परिचय दिला. तर त्याच पुलाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीने वातावरण भावूक झाले. बोले पेट्रोलपंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर अशा चौपदरी उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहोळा शुक्रवारी सायंकाळी नागपूर शहरात होता.
या उड्डाणपुलाला ज्ञानयोगी व काँग्रेसचे नेते दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आधीच घेतला होता. या उड्डाणपूलाच्या लोकार्पण सोहोळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची गर्दी होती, पण सोहोळ्याचे विशेष आकर्षण होते, ते जिचकार कुटुंबिय. महाराष्ट्राच्या राजकारणावर सडकून टिका होत असतानच या लोकार्पण सोहोळ्यात महाराष्ट्रातील राजकारणी संवेदनशील देखील आहेत, याचा परिचय आला.
या लोकर्पण सोहोळ्याला दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री सुलोचना जिचकार, त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री जिचकार तसेच कुटुंबिया विशेषत्वाने उपस्थित होते. व्यासपिठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याविषयी काहीच कल्पना नव्हती. मात्र, नागपुरातील या दोन्ही नेत्यांना याची कुणकुण लागतच श्रीकांत जिचकार यांच्या पत्नी राजश्री जिचकार यांना त्यांनी सन्मानाने व्यासपिठावर आमंत्रित केले.
नागपूर : महाराष्ट्रातील राजकारणावर सडकून टिका होत असतानाच शुक्रवारी नागपूरात आयोजित एका कार्यक्रमात अतिशय भावूक क्षण पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातील एका उड्डाणपूलाला काँग्रेस पक्षातील एका दिवंगत नेत्याचे नाव देऊन संवेदनशिलतेचा परिचय दिला. तर त्याच… pic.twitter.com/ph1F5jNsgf
— LoksattaLive (@LoksattaLive) September 13, 2025
तर व्हिलचेअरवर असलेल्या श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री सुलोचना जिचकार यांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे व्यासपिठावरुन खाली उतरले. त्यांनी व्हिलचेअरवर बसलेल्या सुलोचना जिचकर यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुलोचना जिचकर यांचे पाया पडले. नितीन गडकरी यांनीदेखील नमस्कार केला. यावेळी सुलोचना जिचकार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी फडणवीस व गडकरी या दोन्ही नेत्यांना भरभरून आशीर्वाद दिले.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांनी सुलोचना जिचकार यांच्या सत्कार केला. यादरम्यान व्यासपिठावरुन दिवंगत श्रीकांत जिचकर यांच्याविषयी माहिती दिली जात असतानाच लोकार्पण सोहोळ्यातील वातावरण भावूक झाले. श्रीकांत जिचकार यांच्या आठवणीने सारेच गहीवरले. तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या कृतीने देखील साऱ्यांचे मन जिंकले.