वाशिम : विदर्भातील वाशीम आणि गडचिरोली जिल्हा निती आयोगाने निकाषानुसार मागास आणि अकांक्षित जिल्हे म्हणून घोषीत केले आहे. ही बाब माझ्यासह सर्वांसाठी अभिमानाची बाब नाही. त्यामुळे मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी सर्वकष प्रयत्नाची गरज आहे. राजकारणात खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर चांगले काम केले असेल तर लोक तुम्हाला मानतात त्यासाठी पोस्टर, बॅनर लावण्याची काहीच गरज काय ? असा टोला केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला..

हेही वाचा >>> सोयाबीनवर तो ‘पिवळा मोझॅक’ नसून… शास्त्रज्ञांच्या पथकाचा शासनाला अहवाल

वाशीम जिल्ह्यातील ३६५५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच ५९५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भुमीपुजन सोहळा केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी,लखन मलिक, अमित झनक, तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., माजी आमदार विजय जाधव, राजगुरू, जिल्हाध्यक्ष श्याम बढे, राजू पाटील राजे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, मगासलेपणाचा जिल्ह्याला लागलेल्या डाग सर्वच नेत्यांसाठी भूषणावह नाही. त्यामुळे जिल्हाला विकसित करण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन एक दिलाने काम करा. रस्त्यामुळे विकासाला चालत मिळत आहे. जिल्ह्यात चांगले रस्ते झाले पाहिजे. पण तरीही काही कंत्राटदारांना त्रास दिला जातो. मी कितीही पैसे द्यावला तयार आहे. असे म्हणताच उपस्थितांमधून एकच हाश्या पिकला तर काहींनी टाळ्याची साद दिली.

हेही वाचा >>> क्यूआर कोडशिवाय जाहिराती, ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटिसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील एकमेव आणि बंद अवस्थेत असलेला बालाजी साखर कारखाना सुरू करण्याची एकमुखी मागणी जिल्ह्यातील लोक प्रतीनिधिनीनी गडकरी यंचाकडे केली असता सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आज केंद्रीय मंत्री जिल्ह्यात आले होते. ते ज्या मार्गाने कार्यक्रम स्थळी आले तो रस्ता अत्यंत दर्जाहीन असल्याचे सांगून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. व नव्याने सिमेंट रस्ता बांधून देतो ज्यावर पन्नास वर्षे खड्डे पडणार नाहीत, असे ही गडकरी म्हणाले.