नागपूर : राज्यातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व प्रतिष्ठित सेवांच्या दिशेने वाट मोकळी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लष्करातील सैनिक भरती, केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील नॉन-क्रिमिलेअर गटातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील पात्र विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. आवश्यक पात्रता, अटी-शर्ती व अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती महाज्योतीच्या संकेतस्थळावर देण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले आहे.
लष्करातील सैनिक भरती, केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेकरिता सन २०२५-२५ या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने चाचणी परीक्षेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया ११ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत राहणार आहे. विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या http://www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. महाज्योतीचा संकेतस्थळावर या चाळणी परीक्षेचे प्रवेश अर्ज स्वीकारल्यानंतर तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचा अर्ज हा स्वीकृत होणार. तसेच पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी परीक्षा घेऊन प्रशिक्षणसाठी निवड करण्यात येणार असल्याचेही श्री. प्रशांत वावगे यांनी सांगितले. महाज्योती मार्फत राज्यातील नॉन-क्रिमिलेअर गटातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील यंदाच्या मिलिटरी भरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती http://www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन देखील देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधी देखील देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा घेऊन करण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरीटच्या आधारे निकषांनुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे. ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात येत्या ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. या प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणात ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले.