वाशीम : जिल्ह्यातील कारंजा लाड येथील न्यू राधाकृष्ण रेस्टॉरंट या ठिकाणी शुक्रवारी रात्री ९.५० वाजता विदर्भ ट्रॅव्हल्स थांबली होती. बसमधील प्रवाशी येथे आनंदाने जेवले अन् पुढील प्रवासासाठी उत्साहाने निघाले. मात्र, काहीच क्षणात बुलढाणा येथे भीषण अपघात होऊन संपूर्ण गाडी जळून राख झाली. यामध्ये अनेकांना प्राणास मुकावे लागले. त्यापूर्वीचा हा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला.

सीसीटीव्ही व्हिडीओ

हेही वाचा – Buldhana Accident: वर्ध्यातील एकुण बारा प्रवाशांची आत्तापर्यंत ओळख पटली; सर्वत्र हळहळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात होण्याच्या काही तासांपूर्वी जेवणासाठी विदर्भ ट्रॅव्हल्समधील प्रवाशी वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी थांबले होते. या ट्रॅव्हल्समधील प्रवाशी येथून जेवण करून रात्री १०.३० वाजता समृद्धी मार्गे पुण्यासाठी रवाना झाले. परंतु काही तासांच्या अंतरावर गेल्यानंतर या ट्रॅव्हल्सचा बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला. नंतर गाडी जळून राख झाली. ज्यामध्ये २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र त्यापूर्वीचा त्या प्रवाशांचा व्हिडीओ समोर आला आहे.