वर्धा, जीवनाची अंतिम यात्रा म्हणजे प्रेतयात्रा असे म्हटल्या जाते. त्यामुळं हा अंतिम प्रवास दुःखद अंतकरणाने पार पडतो. दुःख कुटुंबातील सदस्य गेल्याचे असते. पण एक गाव त्या दुःखासोबतच अंतिम प्रवासाचे पण दुख्ख झेलत आले आहे. स्वातंत्र्याची ७६ वर्ष लोटूनही. कारण तिरडीवरचे प्रेतच नव्हे तर ते वाहून नेणारे जीव पण प्राण मुठीत घेत हा प्रवास करतात. पुराच्या पाण्यातून अंतिम यात्रा काढावी लागल्याचा व्हिडिओ नेहमी गाजतो. पण सुधारणा शून्य.
आर्वी मतदारसंघातील कारंजा तालुक्यातील अडीचशे लोकवस्तीचे किंवा आदिवासी पाडे असलेले सुसुंद्र हेटी हे ते गाव. गावाचा इतर जगाशी संपर्क केवळ एका रस्त्याने होतो. या रस्त्यावर पूल नाही. म्हणून पूर येतो तेव्हा त्रेधातिरपीट उडते. या काळात पूर आल्यास पुरातून मार्ग काढावा लागतो. प्रेत यात्रा पण तशीच निघते. कधी कधी तर तोल जातो आणि जीवघेणा प्रसंग उद्भवतो. हे असेच पिढ्यानंपिढ्या चालू आहे. शासन उदासीन आहे कां ? तर याचे उत्तर म्हणजे गावकरी सहकार्य करीत नाही.
रस्त्यावरील नाल्यालागत असलेला शेतमालक पूल करण्यास जागा देत नाही. म्हणून पूल होवू शकला नसल्याचे अधिकारी सांगतात. काही काळ त्याने वाहतूक करण्यास जागा दिली. पण आता यावर्षी परत तो अडून बसला. तुमचे तुम्ही पहा, असे उत्तर आणि गावकरी पडले पेचात. आमदार सुमित वानखेडे म्हणतात की पुरातून प्रेत वाहून नेण्याचा व्हिडिओ जूना असला तरी परिस्थिती अद्याप बदलली नाही, हे मान्य. या गावातील लोकं मला समस्या सांगून गेलेत. अडचण पण सांगितली. मार्ग काढण्याची हमी दिली.
वर्धा, जीवनाची अंतिम यात्रा म्हणजे प्रेतयात्रा असे म्हटल्या जाते. त्यामुळं हा अंतिम प्रवास दुःखद अंतकरणाने पार पडतो. दुःख कुटुंबातील सदस्य गेल्याचे असते. पण एक गाव त्या दुःखासोबतच अंतिम प्रवासाचे पण दुख्ख झेलत आले आहे. स्वातंत्र्याची ७६ वर्ष लोटूनही. कारण तिरडीवरचे प्रेतच नव्हे… pic.twitter.com/Mq1iWEQSsD
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) June 20, 2025
सुदैवाने एक नवा आदेश उपयुक्त ठरणार. बारा फुटी पांदन रस्ता करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्या आधारे या गावात नाल्यालागत रस्ता करणे शक्य आहे. सर्वेक्षण होईल. बाजू ऐकल्या जातील. काम मार्गी लागेल. वेळ लागेल पण नेहमीसाठी समस्या दूर होईल. पण तरीही यावर्षी अडचण आल्यास बिडीओ व अन्य लक्ष ठेवून राहणार आहे. मोबाईल सेवा गावात उपलब्ध आहे. संकट आल्यास शासन धावून जाणार, अशी खात्री आमदार वानखेडे देतात. गावाची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी आहे लोकं एकमेकांना मदत करतात. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहेच, असेही ते म्हणतात.