लोकसत्ता टीम

नागपूर: समाजमाध्यमावर बिबट्याच्या एका व्हिडिओने चांगलीच धम्माल माजवली आहे. हा व्हिडिओ कोणत्या जंगलातला आणि कुणी काढला हे ठाऊक नाही, पण बिबट्याच्या अदांवर पर्यटक चांगलेच फिदा झाले आहेत.

वन्यजीव छायाचित्रकार वन्यप्राण्यांच्या फोटोसाठी तासनतास जंगलात घालवत असतात. मात्र, व्हिडिओतील बिबटोबाने या छायाचित्रकारांना जणू आव्हानच दिले. तुम्हाला फोटो काढायचेत ना, मग सांगा कशी ‘पोझ’ देऊ! छायाचित्रकारांना ‘क्लिक’ करता करता नाकीनऊ येतील इतक्या ‘पोझेस’ या बिबट्याने दिल्या आहेत.

हेही वाचा… ‘गांज्याची शेती करू द्या किंवा किडनी तरी विकण्याची परवानगी द्या’ कर्जबाजारी शेतकऱ्याची मुख्यमंत्री, राज्यपालांकडे मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालताचालता पर्यटकांचे वाहन दिसताच हे महाशय आधी झोपतात. नंतर लगेच दोन पायांवर उभे काय राहतात. त्यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हा नखरेबाज बिबट्या कोणत्या बरे राज्यातील असावा? असा प्रश्न काहींनी केला. तर त्यावर कुणी त्याला ‘मायकल फ्रॉम माय ताडोबा’, तर कुणी त्याला ‘कॅमेराजिवी फ्रॉम गुजरात’ असे उत्तर दिले आहे. काहींनी बिबट्याच्या या व्हिडिओवरुन राजकीय शेरेबाजी देखील केली आहे.