नागपूर : नागपूरमधील बियर बार मध्ये अधिकारी आणि शासकीय फाईल असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. या फाईल्स कोणत्या विभागाच्या होत्या आणि हे अधिकार कोण होते. यासंदर्भात आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाले आहेत. तर विरोधी पक्षांनी या घटनेचा आधार घेत सरकार आणि अधिकाऱ्यांवर टीका केली आहे.

पैसा आणि नशा एवढंच काम आता काही सरकारी बाबूंना उरलंय का? ना जबाबदारी, ना भीती. वरून दारूचा घोट, टेबलाखालून पैशाची नोट?, यांचे लोकसेवेचे भान हरवत चालले आहे. सरकारचा कुणालाच धाक उरलेला नाही, जनतेचे सरकारला काही पडले नाही. सरकार आणि अधिकारी यांचे मात्र सगळे ‘आनंदी-आनंद’ चालले आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर केली.

नागपुरातील मनीषमधील एका बारमधील व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तीन व्यक्ती एक टेबलावर बसून आहेत आणि त्यातील.  एक जण दारूचे घोट घेत शासकीय फायलींना पडताळताना व्हिडिओत दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले ‘हे’ अधिकारी नेमके कोण होते, ‘ते’ कोणत्या विभागाचे होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर बारमध्ये येऊन दारूचा घोट घेत पडताळत होते. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दारूचे घोट रिचवत बीअर बारमध्ये चक्क ‘शासन’ सुरू केल्याची टीका आता समाज माध्यमांमधून केली जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले  आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या या शहरात नेमके चालले काय, असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 नागपुरातील मनीषनगर भागातील एका प्रसिद्ध बीअर बारमधील हा प्रकार असून दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तीन व्यक्ती बारमध्ये आलेत. त्यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक फायलींचा मोठा गठ्ठा देखील आणला होता. त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा गठ्ठा खोलून त्यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. मात्र, हे अधिकारी नेमके कोण आणि कोणत्या विभागाचे आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. ही घटना रविवार दुपारची आहे. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्य बाहेर येऊ शकते, असा नागरिकांचे म्हणणे आहे.