scorecardresearch

Premium

वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले, २१ लोक ईडीच्या रडारवर होते, ते सत्तेत गेल्याने…

सफाई अभियानाचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. रविवारी रात्री ते येथे सुरू युवकांच्या आंदोलनास भेट देण्यासाठी आले होते.

Vijay Wadettiwar criticized Eknath Shinde
वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले, २१ लोक ईडीच्या रडारवर होते, ते सत्तेत गेल्याने… (छायाचित्र – विजय वडेट्टीवार/फेसबुक)

वर्धा : सफाई अभियानाचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. रविवारी रात्री ते येथे सुरू युवकांच्या आंदोलनास भेट देण्यासाठी आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मनुष्य शुद्ध करणारी मशीन व पावडर शोधलाय. सफाई अभियानाच्या निमित्ताने विरोधकांची सफाई करण्यात आली. शिंदे काही खोटे बोलले नाही. ईडी रडारवर असलेले लोकं सत्तेत गेले म्हणजे सफाई झाली. सर्व स्वच्छ झाले.

हेही वाचा – पोलीस विभागातील लाचखोरीत घट; महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार

Rahul-Gandhi-Dog-pet-noorie
‘हा तर मुस्लीम मुलींचा अवमान’, राहुल गांधी यांच्या कुत्र्याच्या नावावरून एमआयएमची टीका
Ved Prakash Arya criticizes BJP
अपयश झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची शरद पवारांवर टीका, राष्ट्रवादीचे प्रतिउत्तर
radhakrishna vikhe patil chavadi
चावडी : वडय़ाचे तेल वांग्यावर.
pankaja munde parikrama yatra
पंकजा यांच्या स्वागतासाठी सोलापूरमध्ये फडणवीस समर्थकच आघाडीवर

हेही वाचा – छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार

भाजपाच्या ओबीसी जनजागरण यात्रेवरही त्यांनी मत व्यक्त केले. भाजपाला आमचा प्रश्न आहे की त्यांनी ओबीसीसाठी काय केले ते सांगावे. जातीनिहाय जनगणना केली का, त्याचे उत्तर द्यावे. महिला आरक्षण बिल आणले, त्यात महिलांसाठी किती जागा राखीव केल्या, त्याचे उत्तर द्यावे. राज्य सरकारने कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय घेतला आहे. तो रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. हा निर्णय सरकारला परत घ्यावाच लागेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay wadettiwar criticized eknath shinde in wardha he commented on ed pmd 64 ssb

First published on: 02-10-2023 at 10:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×