नागपूर : तथाकथित चमत्काराचा दावा करणारे व चमत्कार करा व लाखोंचे बक्षीस जिंकण्याचे अनिसने दिलेले आव्हन न स्वीकारताच नागपूर सोडणारे धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेने नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले आहे.

धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांच्या रामकथा प्रवचनाच्या निमित्ताने नागपुरात आले होते व तेथे त्यांनी ‘दरबार’ भरवून चमत्कार करण्याचा दावा केला होता. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत ही बाब जादूटोणा कायद्याचा भंग करणारी  असल्याने बाबा विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली होती तसेच चमत्कार करून दाखवा व लाखोंचे बक्षीस  जिंका असे आव्हानही दिले होते. मात्र बाबांनी ते न स्वीकारताच नागपूर सोडले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या चमत्काराची पोलखोल करणारे व्याख्यान दिले होते.

आणखी वाचा – नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ३० लाखांचे आव्हान स्वीकारले पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यात काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणा देत विरोध केला होता. अनिसने बाबांना आव्हान दिल्याने विश्व हिंदू परिषद मैदानात उतरली. शुक्रवारी दुपारी २.३०  पासून संविधान चौकात विहिपच्या कार्यकर्त्यांनी अंनिसच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.विश्व हिंदू परिषदेचे धर्म प्रसार प्रमुख राजकुमार शर्मा, भैय्या चौबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अनिस व श्याम मानव यांचा निषेध करणाऱ्या व बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.