लोकसत्ता टीम

नागपूर: लालू प्रसाद यादव आणि प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला हिंदू समजतो त्याला आम्ही विश्व हिंदू परिषदेचा (विहिंप) परिवार मानतो असे मत विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी दिली.

बजरंग दल कार्य विस्तारासाठी महाराष्ट्र आणि गोवा येथे काढण्यात येणाऱ्या यात्रेच्या माहितीसाठी सोमवारी नागपुरातील धंतोली कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. गोविंद शेंडे पुढे म्हणाले, आमचा विहिंप परिवार आणि हिंदुत्वबाबत भूमिका स्पष्ट आहे. जो व्यक्ती स्वतःला हिंदू समजतो तो आमच्या विहिंपचा सदस्य असल्याचे आम्ही मानतो. मग त्याने वेगळा विचार केला तरी हरकत नाही. विहिंपच्या युवा संघटन कार्यविभाग बजरंग दलकडून कार्य विस्तारासाठी देशभरात ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान शौर्य पराक्रम यात्रा काढली जाणार आहे. नागपुरात ही यात्रा १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान निघेल.

आणखी वाचा-अन् माजी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले, जाणून घ्या कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य, पराक्रम आणि विविध हिंदूंनी केलेल्या शौर्याची माहिती हिंदू युवकांना व्हावी म्हणूण हा उपक्रम आहे. त्यात स्थानिक क्रीडापटूंसह विविध क्षेत्रातील नागरिकही सहभागी होतील. यात्रेत किमान २०० कार्यकर्ते कायम राहतील. त्यात काही स्थायी तर प्रत्येक तालुक्यातून जुने कार्यकर्ते निघून नवीन कार्यकर्ते जुळतील. विदर्भात यात्रा ४ हजार ५०० किलोमीटर फिरणार आहे. यात्रेदरम्यान लहान-मोठ्या सभांचेही आयोजन करण्यात आल्याचेही शेंडे म्हणाले. याप्रसंगी प्रशांत तितरे, नवीन जैन, निरंजन रिसालदार उपस्थित होते.