वर्धा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा म्हणजे सर्व ती तयारी जय्यत व्हावी अशी खबरदारी पक्षच नव्हे तर प्रशासनास पण घ्यावी लागते. गत दोन दिवसापासून जिल्ह्यावर पावसाचे सावट आहे. शनि्वारी बरसला पण. पण खरी अडचण सोमवारच्या कार्यक्रमाची आहे.
सोमवारी देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धाचा समारोप वर्ध्यात होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस वर्ध्यात येणार. सोबतच आदिवासी महोत्सव व भाजप जिल्हा कार्यालयच्या भूमिपूजन सोहळ्याचे अतिथी मुख्यमंत्री राहणार. पण ते नक्की येणार का ? हा लाखमोलाचा प्रश्न चर्चेत आहे. कारण ढगाळी वातावरण. शनि्वारी रात्रभर पाऊस व आज पावसाळी वातावरण असल्याने संभ्रम आहे.
जिल्हाधिकारी वान्मथी सी खास ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना म्हणतात की, समस्या येणार नाही. हेलिपॅड तयार आहेत. पण त्याची गरज पडणार नाही. रस्त्याने येण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत सी. एम. दौरा आलेला नाही. पण आम्ही सर्व ती तयारी करून ठेवली आहे. शासकीय कार्यक्रम इव्हेंट सभागृहात आहे. तिथे रंगीत तालीम झाली आहे. तसेच सीएम साहेबांचे अन्य पक्षीय कार्यक्रम आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आवश्यक त्या सूचना देत खबरदारी घेतली आहे, असे जिल्हाधिकारी सांगतात. इव्हेंट सभागृहात आदिवासी प्रकल्प कार्यालय, आरटीओ कार्यालय लोकार्पण व सेवा पंढरवाडा हे कार्यक्रम होतील.
१२ मे रोजी वर्ध्यात येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका शासकीय व अन्य सार्वजनिक कार्यक्रमास हजेरी लावणार असल्याची चर्चाच होते कारण अधिकृत शासकीय लेखी दौरा माहिती कार्यालयास आलेला नाही. जिल्हा प्रशासन पण तेच सांगते. पण भाजप जिल्हा कार्यालयच्या प्रस्तावीत वास्तूचे भूमिपूजन व देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा पण मुख्यमंत्री करतील अशी तयारी सूरू आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा हा भाजपचा महाराष्ट्रातील मुख्य क्रीडा उपक्रम आहे. वर्धातून सुरवात होणार आहे. देशी खेळांना प्रोत्साहन देण्याचे धोरण भाजपने स्वीकारल्याचे एका नेत्याने नमूद केले.
भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपच्या नियोजित जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन होणार. शासकीय कार्यक्रम असलेल्या इव्हेंट सभागृह या नागपूर बायपास रस्त्यावरच हे कार्यालय होणार . त्याचा आनंद आज दिसून आला. विदर्भातील हे एक अव्वल दर्जाचे पक्ष कार्यलय राहणार, असा दावा नेते करतात.