नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाणार नाही, अशी लेखी हमी राज्य सरकारने द्यावी, त्यासाठी मंत्रालयात तातडीने ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी, यासाठी आम्ही सरकारला रविवारपर्यंतची वेळ देत आहोत. सरकारने सकारात्मक पाऊल न उचल्यास सोमवारी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी बेमुदत उपषोण करतील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांनी आज दिला.

चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्याची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे. नागपुरात बेमुदत उपोषण सुरू झाल्यास त्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजबांधव सहभागी होतील. सरकारने आम्हाला सात दिवसांची मुदत मागितली आहे. आम्ही त्यांची मागणी मान्य करीत त्यांना वेळ दिला आहे. अद्यापपर्यंत सरकारकडून चर्चेसाठी कोणतेही बोलावणे आलेले नाही. किती काळ प्रतीक्षा करायची, यालाही मर्यादा आहेत, असे डॉ. तायवाडे म्हणाले.

हेही वाचा – अट्टल पण छुपा मद्यपी कसा असतो? लक्षणे व उपचार काय? वाचा सविस्तर…

हेही वाचा – चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; उपोषणकर्ते टोंगेंची प्रकृती खालावली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींच्या आंदोलनस्थळी भेट दिली होती. ओबीसींची मंत्रालयात येत्या आठ दिवसांत बैठक बोलावण्यात येईल. ओबीसी आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. आता फडणवीस यांनी शब्द पाळावा, त्यासाठी त्यांना रविवारी पर्यंतची वेळ देत आहोत, अन्यथा सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन केले जाईल, असा इशाराही तायवाडे यांनी दिला.