scorecardresearch

Premium

अट्टल पण छुपा मद्यपी कसा असतो? लक्षणे व उपचार काय? वाचा सविस्तर…

अलीकडे केलेल्या एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की अति मद्यपान करण्याने सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण होऊ शकते, असे मत मेघे अभिमत विद्यापीठातील मानसोपचार तज्ञ डॉ. प्रकाश बेहरे व्यक्त करतात.

alcoholic
अट्टल पण छुपा मद्यपी कसा असतो? लक्षणे व उपचार काय? वाचा सविस्तर… (image – pixabay/representational image)

वर्धा : आजच्या धकाधकीच्या जीवनात अतीताणामुळे मद्यपान वाढत आहे. अलीकडे केलेल्या एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की अति मद्यपान करण्याने सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण होऊ शकते, असे मत मेघे अभिमत विद्यापीठातील मानसोपचार तज्ञ डॉ. प्रकाश बेहरे व्यक्त करतात.

जर तुमच्या जवळची व्यक्ती जास्त मद्यपान करत असेल तेव्हा तुम्ही काय कराल? जरी अशी व्यक्ती आपले काम नीट करत असेल, नातेसंबंध जपत असेल तरी याचा अर्थ असा नाही की जास्त मद्यपान करण्यात कोणताही धोका नाही. असा अट्टल पण छुपा मद्यपी काही बाबींतून ओळखता येतो.

National level selection
ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर निवड, शर्विन कार्व्हालो विद्यार्थ्यास संशोधनासाठी पाठ्यवृत्ती
shweta mahale, students poisoned in government hostel in Chikhli
चिखलीतील शासकीय वसतिगृहातील ६ विद्यार्थिनींना विषबाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरू; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
cancer at an early stage
‘कॅन्सर’ झाला की नाही हे पहिल्याच टप्प्यात सांगणाऱ्या यंत्राचा शोध, वाचा कॅन्सरला कसे हरवता येणार
CBSE Exam Pattern
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, सीबीएसई परीक्षा पद्धतीत मोठा बदल; दहावी व बारावीचे प्रश्न सक्षमतेवर

हेही वाचा – काँग्रेस कामगार सेल जिल्हाध्यक्ष संकत यांच्या जुगार अड्ड्यावर छापा

१. मद्यपी सामान्यत : अन्नापेक्षा अल्कोहोलला प्राधान्य देतो, अनेकदा असे लोक जेवणाऐवजी त्यांचे पेय घेतात. बरेचदा त्यांची खाद्यपदार्थांवरची इच्छा उडून जाते.

२. दीर्घकाळ नियमितपणे मद्यपान केल्याने त्यावरील अवलंबित्व सुरू होते. ते सतत मद्यपींच्या रक्तात असते आणि त्यांचे शरीर कधीही सोडत नाही.

३. मानसिकदृष्ट्या, मद्यपी दारूवर अवलंबून असतात. एक-दोन दिवस दूर राहावे लागल्यास ते अस्वस्थ आणि चिडचिडे होतात.

४. एक कार्यरत मद्यपीचे एक किंवा दोन ग्लास पेयाने समाधान होत नाही. ते आणखी मागत राहातात. त्यांच्याकडे अल्कोहोलसाठी उच्च सहनशीलता असते कारण त्यांचे शरीर भरपूर प्रमाणात मद्य पचवण्यासाठी अनुकूल झालेले असते.

५. स्मरणशक्ती कमी होणे आणि मेंदूचे कार्य मंदावणे : अल्कोहोलचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. अति मद्यपान केल्याने त्यांची स्मरणशक्ती कमी होते. त्यांना काही गोष्टी आठवू शकत नाहीत.

६. वास्तव नाकारणे : जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात अल्कोहोल घेते तेव्हा तो/ ती ही गंभीर समस्या असल्याचे मान्य करत नाही. त्यांना त्यांचे मनोरंजन गमवायचे नसल्याने ते वास्तव नाकारतात आणि या विषयात विचारले असता खोटे बोलतात.

७. संवेदनाहीन औचित्य : कार्यरत व्यसनाधीनांना मोठ्या प्रमाणात मद्यपान करण्याचे निमित्तच हवे असते. ते वेगवेगळी कारणे देतात जसे की, “मी पितो कारण मला कामाचा ताण आहे” किंवा “मला फक्त माझ्या मित्रांसोबत आराम करायचा आहे”.

८. मद्यपी दारू लपवतात : कार्यरत मद्यपी सहसा त्यांचे पेय गुप्त ठिकाणी ठेवतात. कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ते दारू ठेवतात किंवा मद्यपान करतात.

९. वर्तन बदल : दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तीला मूड स्विंग्सचा अनुभव येतो. त्यांचे मूड सतत बदलत राहातात. ते एखादा टोकाचा निर्णय घेण्याचीही शक्यता असते.

हेही वाचा – नागपूर : शिक्षणाची ओढ असताना लग्न ठरविल्यामुळे तरुणीची आत्महत्या

हे टाळता येवू शकते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार प्राप्त डॉ. बेहरे म्हणतात की, मित्रांसोबत पिणारा जेव्हा एकटा प्यायला सुरवात करतो तीच धोक्याची पहिली घंटा समजावी. असा कोणी संपर्कात आल्यास त्वरित तज्ञाशी संपर्क साधावा. व्यसनमुक्ती केंद्र सर्वत्र आहे. ते अश्या मद्यपीवर उपचार करतात. थेरेपी, आहार सल्ला, व्यायाम व अन्य कौशल्य वापरून सुधारणा होते. अतिरिक्त मद्यपान जीवास धोका ठरणार असल्याचे गळी उतरवल्या जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is a hidden alcoholic like what are the symptoms and treatment read in detail pmd 64 ssb

First published on: 21-09-2023 at 11:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×