नागपूर: जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला आहे. महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी या मसुद्याला विरोध केला आहे. आता भाजपमधूनही याला विरोध होत आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी नगरमध्ये झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात सरकारला धारेवर धरत जरांगे यांच्यावरही सडकून टिका केली.

हेही वाचा – यवतमाळ : क्रिकेट पिचसाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली येऊन बालकाचा मृत्यू

हेही वाचा – अकोल्यात टोळीकडून दोन पिस्तुलसह नऊ जिवंत काडतूस जप्त, आरोपी आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगारांच्या संपर्कात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पडाळकर म्हणाले की, “सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत काढलेल्या अधिसूचनेचा मसुदा केवळ ओबीसींच्याच हक्कावर गदा आणत नाही तर एससी एसटीच्या आरक्षणावर घाला घालणारा आहे”. पुढे ते म्हणाले की, “रामोश-बेरड, बेडर यात विवाह होतात. ते सगे सोयरे आहेत. काही अनुसूचित जातींमध्ये येतात तर काही महाराष्ट्रात भटके विमुक्तात येतात, पण सगळ्या रामोशी बांधवांना एससीचं सर्टिफिकेट देता येत नाही.”