नागपूर येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने देश- विदेशातील वैज्ञानिक, संशोधकांचा मेळा भरला आहे. या परिषदेच्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पेस ऑन व्हील्स’ हा त्यातलाच एक प्रकार आहे. आंतराळविषयी माहिती देणारे फिरते प्रदर्शन असून ते नागपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा- नागपूर विद्यापीठ परिसराला विज्ञानाच्या पंढरीचे रूप; नवनवीन संशोधनांचे आजपासून महाप्रदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विज्ञान परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. विज्ञान काँग्रेसची संकल्पना ” महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” अशी आहे. या कार्यक्रमात आयोजित चर्चासत्रे आणि प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी खुली आहेत. स्पेस ऑन व्हील्स या अंतराळाविषयी माहिती देणा-या बसची प्रदर्शन स्थळी चर्चा आहे. तज्ज्ञांकडून आंतराळात घडामोडींची माहिती दिली जाते. स्पेस ऑन व्हील्सप्रमाने अन्य नावीन्यपूर्ण प्रयोग परिषदेच्या निमित्ताने नागपूरकरांना पाहण्याची संधी मिळणार आहे.