नागपूर: सोन्याचे वाढते दर सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवत आहे. करोनानंतर बघता- बघता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम जीएसटी व मेकिंग शुल्क वगळता १ लाख रुपयांवर पोहचले. परंतु आता दर कमी झाले आहे. चवदा दिवसांनी शुक्रवारी (२७ जून २०२५) सोन्याचे दर तब्बल ४ हजार रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लग्न सराईच्या दिवसात सोन्याचे वाढते दर विक्रमी उंचीवर जात असल्याने ग्राहक आवश्यकतेनुसार खूप कमी वजनाच्या दागिन्यांनाच प्राधान्य देत होते. हे दर कमी कधी होणार? हा प्रश्न सराफा व्यवसायिकांना विचारला जात होता. तर सराफा व्यवसायिक दर आणखी वाढण्याचे संकेत देत होते. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात १३ जुनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून सोन्याच्या दराने २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर १३ जून २०२५ रोजी दुपारी प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख रुपये रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७८ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार रुपये नोंदवले गेले. हे दर २७ जूनला दुपारी १२ वाजता प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९६ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ८९ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार ४०० रुपये होते. त्यामुळे नागपुरात सोन्याच्या दरात १३ जूनच्या तुलनेत २७ जूनला सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति १० ग्राम ४ हजार रुपये, २२ कॅरेटमध्ये ३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ३ हजार १०० रुपये, १४ कॅरेटमध्ये २ हजार ६०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरातही घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो १३ जून २२५ रोजी १ लाख ७ हजार १०० रुपये होते. हे दर २७ जुनला दुपारी प्रति किलो १ लाख ६ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात १३ जून २०२५ रोजीच्या तुलनेत २७ जून २०२५ रोजी ७०० रुपये प्रति किलोने घट झालेली दिसत आहे. सोन्याच्या दरात मोठी घट झाली असली तरी तुलनेत चांदीच्या दरात मात्र फारसा फरक पडला नाही.