नागपूर : भरधाव दुचाकीसमोर अचानक मोकाट कुत्रा आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली. यात दुचाकीवरील दोघेही मायलेक खाली पडून जखमी झाले. यात महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना खासगी रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला. अमिता मोहन निंबाळकर (६२) असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास संजय नगर, पांढराबोडी वस्तीजवळ, अंबाझरी बायपास रोडवर घडली. मोहित मोहन निंबाळकर (३६, रा. टॉप अ‍ॅण्ड टाऊन शाळेजवळ, प्रतापनगर) हे त्यांची आई अमीता निंबाळकर यांना घेऊन शेतीच्या कामाकरीता झिल्पी गाव येथे गेले होते. तेथून ते दुचाकीने घरी परतत होते. अंबाझरी हद्दीतील संजय नगर, पांढराबोडी वस्तीजवळ, अंबाझरी बायपास रोडवर अचानक त्यांच्या दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ते दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यात मोहित निंबाळकर यांना किरकोळ मार लागला, पण त्यांच्या आईच्या डोक्याच्या मागे मार लागल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – नागपूर : भरधाव कारची दुचाकीला धडक, युवक उड्डाण पुलावरून खाली पडला

हेही वाचा – “शिंदे, फडणवीस आणि पवार या त्रिकुटाला घरी बसवा,” विद्यार्थ्यांचा संताप; अजित पवार असे काय बोलले की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी मोहित निंबाळकर यांनी दिलेल्या सुचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.