नागपूर: भारतरत्न आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत. २७ ऑगस्ट २००० मध्ये वाजपेयी यांनी स्मृती मंदिराला भेट देत आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चला माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमिपूजनासाठी नागपुरात आले असून यावेळी स्मृतीमंदिराला भेट देणारे दुसरे पंतप्रधान ठरले. अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनीही तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर स्मृती मंदिर परिसराला भेट दिलेली आहे. याचे वैशिष्ट्य काय हे आपण जाणून घेऊया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी नऊ वाजता नागपुरात आगमन झाले. यावेळी त्यांनी रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यानिमित्त संघभेटीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. संघाच्या मुशीत घडलेले अटल बिहारी वाजपेयी हे स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या लोकसभेत भारतीय जनसंघाच्या तिकीटावर निवडून आलेल्या चार खासदारांपैकी एक होते. वाजपेयी यांची जडनघडण संघाच्या मुशीत झाली होती. पंतप्रधान झाल्यावर त्यांची नाळ संघाशी जुळलेली होती. त्यामुळे १९९९ मध्ये स्थिर सरकार येताच आपल्या मंत्रिमंडळासह त्यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली होती. संघाच्या स्मृतीमंदिराला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी तीनवेळा भारताचे पंतप्रधान पद भूषविले आहे. ते पहिल्यांदा १९९६ मध्ये फक्त १३ दिवसांचे पंतप्रधान बनले होते. यानंतर ते १९९८ ते १९९९ पर्यंत १३ महिन्यांचे पंतप्रधान बनले. यानंतर १९९९ ते २००४ या काळात ते पुन्हा ५ वर्षांसाठी देशाचे पंतप्रधान राहिले होते. यादरम्यान २००० साली त्यांनी नागपूर येथे काही कार्यक्रमासाठी आले असता संघाच्या स्मृतीमंदिराला भेट दिली होती. यावेळी तत्कालीन मंत्री प्रमोद महाजन, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अनेक नेते उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भ प्रांत ससहसंघचालक डॉ. श्रीराम जोशी यांनी यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वागत केले होते. यानंतर त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली होती. नरेंद्र मोदी हे २०२४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१९ मध्ये आणि त्यानंतर २०२४ मध्ये पंतप्रधान झाले. परंतु, आपल्या मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेकदा नागपूरला भेट देऊनही रेशीमबाग येथील स्मृती मंदिर स्थळाला भेट दिली नव्हती. मात्र २०२४ ला तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर एका वर्षाच्या आत त्यांनी नागपूर एका कार्यक्रमासाठी आले असता स्मृती मंदिर स्थळाला भेट देऊन डॉक्टर हेडगेवार आणि गोडवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनीही त्यांच्या तिसऱ्या टर्ममध्येच संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिलेली आहे विशेष.