नागपूर : लोकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला राज्यात फारसे यश आले नाही. विदर्भात अकोला वगळता इतरत्र वंचित आघाडीला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून निर्माण झालेला वंचित बहुजन आघाडीचा ‘फुगा’ पुरता फुटल्याचे दिसून येत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत वंचितमुळे नांदेड, सोलापूर, सांगली, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलढाणा, हातकणंगले या सात मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत व्हावे लागले होते. २०१९ च्या लोकसभेत वंचितने तब्बल ४१ लाख मते घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले नव्हते. त्यामुळे वंचित आघाडीने त्यांचे उमेदवार उभे केले. वंचितच्या १५ उमेदवारांनी साधारण ९० हजार ते ३ लाखांपर्यंत मते मिळवली आणि तीच मते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती.२०१९ सांगलीमध्ये ३ लाख २३३ मते होती. यावेळी येथे वंचितने उमेदवार दिला नव्हता. गडचिरोली-चिमूर बहुजन वंचित आघाडीच्या हितेश मडावी यांना १५ हजार ९२२ मते मिळाली आहे. २०१९ मध्ये येथे वंचितने एक लाख ११ हजार ४६८ मते घेतली होती. बुलढाणा येथे वंचितचे वसंतराव मगर यांना ९८ हजार ४४१ मते मिळाली. येथे वंचितने मागील निवडणुकीत एक लाख ७२ हजार ६२७ मते घेतली होती. अमरावतीमध्ये वंचितचे आनंदराज आंबेडकर यांनी १८ हजार ७९३ मते घेतली. २०१९ मध्ये वंचितला येथे ६५ हजार १३५ मते मिळाली होती. तर अकोलामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली मते कायम ठेवली. त्यांना २ लाख ७६ हजार ७४७ मते मिळाली. मागील निवडणुकीत त्यांनी २ लाख ५९ हजार ७८७ मते घेतली. याशिवाय २०१९ मध्ये वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नांदेड, सोलापूर, हातकणंगले, परभणी, सांगली मतदारसंघातील उमेदवार पराभूत झाले होते. यावेळी नांदेडमध्ये वंचितला ९२५१२ मते मिळाली. मागच्या वेळी १ लाख ६६ हजार १९६ मते होती. सोलापूरमध्ये वंचितने उमेदवार दिला नव्हता. गेल्यावेळी वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: येथे उमेदवार होते. त्यांना १ लाख ७० हजार ७ मते मिळाली होती. हातकणंगलेमध्ये वंचितने ३२ हजार ६९६ मते घेतली. २०२९ मध्ये वंचितला येथे १ लाख २३ हजार ४१९ मते घेतली होती. परभणीमध्ये ९५ हजार ९६७ मते मिळाली आहेत. मागील निडणुकीत येथे १ लाख ४९ हजार ९४६ मते मिळाली होती.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Live Updates
Maharashtra News Updates : अखेर धारावीकरांनी बंद पाडले अदानीचे सर्वेक्षण, अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड उद्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार
What Chhagan Bhujbal Said?
अजित पवारांना बरोबर घेतल्याने भाजपाचं नुकसान? छगन भुजबळांचं भुवया उंचावणारं उत्तर; म्हणाले, “आम्हाला..”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Aditi Tatkare Sunetra Ajit Pawar
सुनेत्रा पवारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं मात्र आदिती तटकरेंकडून, काय घडलं नक्की…
What Bhujbal Said About Raj Thackeray ?
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”
uddhav thackeray prakash ambedkar (2)
“गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”

हेही वाचा – नागपूर जिल्ह्यात स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू, आठ ते दहा कामगार जखमी

हेही वाचा – VIDEO : ताडोबात वाघ नाही, तर अस्वलाने केली ‘ही’ करामत; पाहून तुम्हीही म्हणाल…

विदर्भातही वंचितची घसरण

वंचित बहुजन आघाडीने रामटेकमध्ये किशोर गजभिये यांना समर्थन दिले होते. त्यांना २४ हजार ३८३ मते मिळाली. अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना १८ हजार ७९३, भंडारामध्ये संजय केवट यांना २४ हजार ८५८ मते, चंद्रपूरमध्ये राजेश बेले यांना २१ हजार ९८० राजेश बेले, गडचिरोलीत हितेश मडावी यांना १५ हजार ९२२, वर्धा येथे राजेंद्र साळुंखे १५ हजार ४९२, यवतमाळमध्ये हरिभाऊ राठोड १७ हजार ३९६ आणि बुलढाणा येथे वसंत मगर यांना ९८ हजार ४४१ मते मिळाली.