नागपूर : राजकीय नेत्यांना किंवा धुर्त व्यक्तीला सरड्यासारखा रंग बदलतो, असे म्हणून हिणवले जाते. मानवी स्वभावाचे ते एक वैशिष्टे असू शकेल, परंतु सरड्याप्रमाणे रंग बदलतो, असे म्हणण्याचे कारण आहे. आणि रंग बदलतो कसा? विशेषत: तो उन्हाळ्यात अधिक झपाट्याने रंग बदलतो, याचे नैसर्गिक आणि शास्त्रीय कारणे आहे.
भारतीय सरडा रंग बदलतो. त्याला ‘चेंजेबल लिझर्ड’ किंवा ‘गार्डन लिझर्ड’ असेही म्हणतात. त्याचा रंग विविध कारणांमुळे बदलतो. हा रंगबदल त्याच्या जैविक गरजा, वातावरणीय परिस्थिती आणि सामाजिक वर्तन यावर आधारित असतो.
सरड्याचे रंग बदलण्याचा आणि मानवी स्वभावाचा काहीही संबंध नाही. तरीपण सरड्या प्रमाणे रंग बदलतो, असे एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो. तेव्हा व्यक्तीला कपटी आणि धुर्त म्हणायचे असते. परंतु सरडा रंग बदलतो, तो त्याच्या वातावरणीय परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता असते, असे तज्ञाचे मते आहे. तज्ञांच्या मतानुसार सरडा रंग बदलण्याची अनेक कारणे आहेत.
प्रजनन हंगामातील आकर्षण:

नर सरडे प्रजनन हंगामात (साधारणतः मे आणि जून महिन्यात) आपला रंग गडद लालसर किंवा नारिंगी करतात, ज्यामुळे ते मादीला आकर्षित करतात आणि इतर नरांशी स्पर्धा करतात. हे रंग बदलणे त्यांच्या सामाजिक वर्तनाचा भाग आहे.

तापमानानुसार रंग बदल:

उष्णतेच्या प्रमाणानुसार सरड्याचा रंग बदलतो. उष्ण वातावरणात ते गडद रंग घेतात. त्यामुळे उष्णता शोषण वाढते, तर थंड वातावरणात ते फिकट रंग घेतात. त्यामुळे उष्णता कमी शोषली जाते. या प्रक्रियेला ‘थर्मोरेग्युलेशन’ म्हणतात.

पर्यावरणाशी जुळवून घेणे (कॅमोफ्लाज)

सरडे आपल्या आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतात. उन्हाळ्यात ते हलके तपकिरी किंवा पिवळसर रंग घेतात, ज्यामुळे ते कोरड्या वातावरणात चांगले मिसळतात. पावसाळ्यात ते हिरवे किंवा गडद रंग घेतात, ज्यामुळे ते हिरव्या झाडांमध्ये चांगले दिसतात.

भावनिक स्थिती:

जर सरडा घाबरला, चिडला किंवा आक्रमक झाला, तर त्याचा रंग लगेच बदलू शकतो. हे रंग बदलणे त्याच्या भावनिक स्थितीचे संकेत असू शकतात.

जैविक रचना :

सरड्याच्या त्वचेमध्ये ‘क्रोमॅटोपोर्स’ नावाच्या पेशी असतात, ज्याद्वारे रंगद्रव्यांचे वितरण नियंत्रित होते. या पेशींच्या क्रियेमुळे सरड्याचा रंग बदलतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रजनन हंगामात नर सरड्याचे रंग:

नर सरड्याचे डोके आणि मानेचा भाग लालसर किंवा नारिंगी होतो, ज्यामुळे ते मादीला आकर्षित करतात. हे रंग बदलणे त्यांच्या सामाजिक वर्तनाचा भाग आहे.