नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली अशोक विजयादशमीला दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी सकाळी ९ वाजता भदंत चंद्रमणी महस्थाविर यांच्यामार्फत दीक्षा ग्रहण केली होती. त्रिशरण आणि पंचशील म्हणत हा कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा – संघाच्या दसरा मेळाव्यात गडकरी, फडणवीसांची उपस्थिती

हेही वाचा – गडचिरोली : मेडीगड्डा धरणावरून राजकीय वातावरण तापले, पुलाला तडे गेल्याने सीमाभागात धोक्याचा इशारा

या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ९ वाजता विशेष बुद्ध वंदना घेतली जाते. भदंत सुरई ससाई यांच्या हस्ते ही वंदना घेतली जाते. यावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचेदेखील पठण केले जाते. यंदाही विशेष बुद्ध वंदना लाखो अनुयायांसह घेण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली.