नागपूर : घराच्या छतावर विवाहित महिला कुटुंबासह झोपायला गेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास महिलेचा प्रियकर दबक्या पावलाने भेटायला आला. तिचा हात हातात घेऊन पायऱ्यावर गप्पा करीत बसला. तेवढ्यात तिच्या पतीला जाग आली. त्याने पत्नीच्या प्रियकराला बघताच कुटुंबियांना आवाज दिला आणि त्या युवकाला यथेच्छ चोप दिला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
आरोपी गोल्या हा दारुडा असून शेतमजुरी करतो. त्याची गावातील एका विवाहित महिलेशी मैत्री झाली. तिच्या घरी गोल्याची ये-जा वाढली. मात्र, गावातील युवक काही कामानिमित्त येत असल्यामुळे त्या महिलेच्या सासू-सासऱ्यांनी फारशी विचारपूस केली नाही. त्यामुळे तो वारंवार कोणत्याही कामाचा बहाणा करीत घरी यायला लागला. विवाहित महिला आणि गोल्याचे सूत जुळले. त्यामुळे तिच्या भेटीला तो तिच्या शेतातही जायला लागला.
हेही वाचा – हवामान खात्याचा दिलासा! मुंबईत बरसणार पण..
गेल्या चार महिन्यांपासून दोघांच्या मैत्रीबाबत कुणालाही कुणकुण नव्हती. १८ जूनला रात्री साडेदहा वाजता जेवण करून सर्वजण घराच्या छतावर झोपायला गेले. ती महिलासुद्धा छतावर झोपली होती. मध्यरात्री एक वाजता गोल्या त्या महिलेच्या छतावर आला. त्याने महिलेला झोपेतून उठवले. तिला घेऊन तो खाली पायऱ्यावर महिलेशी गप्पा करीत बसला.
हेही वाचा – नागपूर : गर्भवती महिलांना ‘या’ मंदिरात अद्यापही प्रवेश नाही
काही वेळात महिलेच्या पतीला जाग आली. त्यांनी बघितले तर पत्नी बेडवर नव्हती त्यामुळे तो अंधारातच पायऱ्याजवळ आला. त्याला कुणाचा तरी आवाज ऐकू आला. त्यामुळे तो समोर गेला असता पत्नी आणि गोल्या दिसले. त्याने लगेच गोल्याला पकडून ठेवले आणि कुटुंबियांना हाक दिली. कुटुंबियांना गोल्याची चांगली धुलाई केली. गोल्याने हाताला झटका मारला आणि पळून गेला. या प्रकरणी जलालखेडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गोल्यावर गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.