गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अंभोरा गावात चारित्र्याच्या संशया वरून एका इसमाने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. गुरूवार रात्री ११:३० वाजताच्या सुमारास ही घटनाघडली. आरती सुनील पटले (३०) रा. अंभोरा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा पतीसुनील मदन पटले ( ३५ ) रा. अंभोरा हा आरोपी आहे.
गुरुवारी रात्री पती-पत्नीत वादावादी झाली. ती विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात सुनीलने घरातील कुऱ्हाडीने पत्नी आरतीवर वार करून तिची हत्या केली. रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील आणि आरती यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दांपत्याला एक दीड वर्षाचा मुलगा आहे. सुनीलला आरतीच्या चरित्रावर संशय होता. यावरून गेल्या सहा महिन्या पासून दोघांमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली होती. गुरुवारी ८ मे रोजी रात्री उशिरा या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले, ज्यात सुनीलने रागाच्या भरात कुऱ्हाडने पत्नीवर हल्ला केला.
हत्येची घटना घडल्यावर सुनील पटलेने रावणवाडी पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध हत्या आणि अन्य आरोपांच्या खाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नवकार हे करीत आहेत.. तपासा दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार लग्नानंतर दोघांचे सुखी संसार सुरू होते पण गेल्या एक वर्षापासून सुनील हा आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे दोघात गेल्या सहा महिन्यापासून भांडण व्हायला सुरुवात झाली होती गुरुवारी अशाच झालेल्या भांडण्यातून सुनीलने आरतीची कुऱ्हाडीने वार करून त्या केली, असे रावणवाडीचे पोलीस निरीक्षक मंगेश पवार यांनी सांगितले.