लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे भारत माता की जय म्हणणार नाही, असे जाहीरपणे बोलतात, नबाब मलिक देखील कोण आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. पण या दोघांबद्दल आमदार यशोमती ठाकूर यांचे तोंड बंद असते. भिडे गुरुजींचा मात्र त्या अपमान करतात, हे आम्हाला अजिबात सहन होणार नाही, असे भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आणि खासदार डॉ. अनिल बोंडे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भिडे गुरुजींचा भाजपशी कुठलाही संबंध नाही, मात्र एक हिंदू व्यक्ती म्हणून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे डॉ. अनिल बोंडे म्‍हणाले. यशोमती ठाकूर यांनी भिडे गुरुजींना हरामखोर, नालायक असे म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांना भिडे गुरुजींवर अशा शब्दात बोलण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा, अशी आमची मागणी असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

आणखी वाचा-“त्या नेत्यांची लोक धुलाई करतात!” उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच गडकरींची तुफान टोलेबाजी, म्हणाले…

भिडे गुरुजींना शिव्या देऊन यशोमती ठाकूर यांनी शेकडो युवकांच्या भावना भडकवल्या असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा, असे अनिल बोंडे म्‍हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will not tolerate insulting bhide guruji says mp anil bonde mma73 mrj
First published on: 30-07-2023 at 16:48 IST