लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या भानूसखिंडी निमढेला परिसरात तीन बछड्यांसाठी जखमी असूनही धडपडणा-या वाघिणीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. आज सकाळी पर्यटकांना ही वाघीण जखमी अवस्थेत दिसून आली. वाघिणीवर वेळीच उपचार करावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी ताडोबा व्यवस्थापनाकडे केली आहे.

हेही वाचा… महिला सरपंच, सदस्यांचा अनोखा फंडा; मालमत्ता कर भरा अन् वर्षभर मोफत दळण दळा

हेही वाचा… चंद्रपूर : भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
viral video

उन्हाळा सुरू होताच ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. आज सकाळी ताडोबात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना भानुसखिंडी निमढेला परिसरात एक वाघीण गंभीर जखमी अवस्थेत तिच्या तीन बछड्यांना सोबत घेऊन फिरताना दिसून आली. छोट्या पाणवठ्यावर ही वाघीण फिरत होती. तिच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने चालताना तिला प्रचंड वेदना होत होत्या. हा व्हीडिओ एका वन्यजीवप्रेमीने समाज माध्यमावर शेअर केला. वन्यजीव अभ्यासकांनी तो व्हीडिओ पाहून लगेच ताडोबाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना माहिती दिली. ताडोबा व्यवस्थापन या जखमी वाघिणीवर लक्ष ठेऊन आहे.