लोकसत्ता टीम

चंद्रपूर : जिल्ह्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मुधोली बिटमध्ये शुक्रवारी, २५ ऑगस्टला सायंकाळी लक्ष्मीबाई रामराव कन्नाके (६०) या महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-यवतमाळ : मित्राला मागितले दहा हजार, त्याने नकार देताच थेट गळयावर फिरवला चाकू….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भद्रावती तालुक्यातील मौजा टेकाडी येथील त्या रहिवासी होत्या. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किटे आणि क्षेत्रीय वनरक्षक व वनपाल यांचे सोबत मौका पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे नेण्यात आले. मृतकाचा मुलगा काशिनाथ रामराव कन्नाके यांना तात्काळ मदत म्हणून ५० हजार देण्यात आले. सदर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून गावकऱ्यांना शेतीचे काम करीत असतांना वन्यप्राण्यापासून सावध राहण्याच्या सूचना देऊन जनजागृती करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली हे करीत आहेत.