लोकसत्ता टीम

वर्धा : महिलांचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेवाभावी महिला होमगार्ड सुद्धा सुरक्षित नसल्याची घटना पुढे आली आहे. या महिलेचा हात तर मोडलाच पण डोकेही ठेचल्या गेले. या प्रकरणी दिनेश तुमाने व जगदीश गराड या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.

सदर महिला होमगार्ड रात्रीच्या सुमारास घरी जात असतांना दिनेशने तिला फोन करीत जगदीशच्या घरी बोलावले. १५ मिनिटात घरी न आल्यास तमाशा करेन असे धमकावले. तेव्हा कारला चौकात जात ती दिनेशच्या गाडीवर बसून गरडकडे पोहचली. तिथे दिनेशने घरात जाण्यास सांगितले. तेव्हा या महिलेने नकार दिल्यावर गॅलरीत गरडने शिवीगाळ केली. हे पाहून ती पायीच परत निघाल्यावर गरड व तुमाने यांनी पाठलाग करीत तिला अडवून मारहाण सुरू केली. लाथाबुक्क्याने बेदम मारले. नालीत ढकलले. या जीवघेण्या मारहाणीत सदर महिलेचा हात मोडला तसेच डोक्याला मार बसला. सध्या तिच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिने याप्रकरणी तक्रार दिल्यावर रामनगर पोलिसांनी या दोन पोलीस शिपायावर गुन्हे दाखल केले.

आणखी वाचा-अमरावती-नागपूर महामार्गावर एसटी बस उलटली; एक जण ठार, २८ प्रवासी जखमी

जावयाच्या छातीत सासऱ्याने चाकू खुपसला.

अन्य एका घटनेत मुलीने प्रेमाविवाह केल्याने संतप्त कुटुंबाने जावयावर हल्ला करीत राग काढला. आर्वीलगत सायखेडा येथील ऋषीकेश वासुदेव साबळे असे जखमी तरुणाचे नावं आहे. त्याने ११ वर्षांपूर्वी रमेश ठाकरे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे त्याची सासरी बोलचाल बंदच होती. एका कार्यक्रमाचे सासरकडून निमंत्रण आले. तेव्हा बोलचाल बंद आहे तर निमंत्रण कश्याला दिले, असा प्रश्न साबळेने केला. पुढे तो एकदा आपल्या मुलीला शाळेतून आणण्यास जात असतांना सासरा रमेश ठाकरेने हातात दगड घेऊन जावयास अडविले. दगडाने मारले. तिथेच साळे प्रताप व शुभम पोहचले. रमेशने जावयाचे हात पकडून ठेवले तर साळ्यांनी चाकूने छातीत भोसकले. तसेच काठीने मारहाण केल्याने जावई बेशुद्ध पडला. हे पाहून आरोपी सासरा व साळे पसार झाले. पत्नीने जखमी नवऱ्यास रुग्णालयात भरती केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियकराच्या रागापोटी आत्महत्या.

प्रियकर रागावल्याने प्रीती संजय घरडे या तरुणीने घरच्या सिलिंग फॅनला गळफास लावत आत्महत्या केली. प्रियकर धीरज धर्मराज वाळके याने तक्रार केल्यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.