जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ९ सप्टेंबर २००१ या दिवसाची नोंद आहे. अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्राच्या (वर्ल्ड ट्रेड सेंटर) दोन इमारतींवर दहशतवादी हल्ला केला असे सांगण्यात येते. मात्र, हा हल्ला नसून अमेरिकेचा एक कट होता.

हल्ला होण्याच्या दोन दिवसांआधी देखभाल दुरुस्तीसाठी संपूर्ण इमारतीचे काम बंद ठेवणे, हल्ल्याच्या सहा महिन्यांआधी इमारतीचा विमा काढून ठेवणे, ९०व्या माळ्यावर विमान पडले असताना संपूर्ण इमारत कोसळणे या साऱ्याच घटना संशय उपस्थित करणाऱ्या असून अमेरिकेतील ९/११ चा हल्ला हा बनावटी होता, असा थेट आरोप संदर्भासहित अर्थतज्ज्ञ, लेखक व अभिनेता दीपक करंजीकर यांनी केला.‘जनमंच’च्या वतीने आयोजित जनमंच-जनसंवाद कार्यक्रमात ‘घातसूत्र-जागतिक भ्रष्टाचार व त्याची पाळेमुळे’ या विषयावर दीपक करंजीकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. शंकरनगर स्थित साई सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप, उपाध्यक्ष ॲड. मनोहर रडके उपस्थित होते.

हेही वाचा: खळबळजनक! बाळ विक्री प्रकरणात एका भगवे वस्त्रधारी महाराजाचा नव्याने प्रवेश

जागतिक स्तरावरील घटनांचा वेध घेणारे ‘घातसूत्र’ पुस्तकामुळे दीपक करंजीकर यांची मराठी साहित्य व अर्थ क्षेत्रात स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी ९/११च्या निमित्ताने अमेरिकेतील स्थिती व त्याचा जगावर झालेला परिणाम यांचा वेध ओघवत्या वक्तृत्व शैलीत घेतला. ११ सप्टेंबर २००१ मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला व त्यामागील घटनांचे वास्तव अभ्यासात्मक विश्लेषण मांडले. जगात दररोज घडणाऱ्या अशा अनेक महत्त्वाच्या वाटणाऱ्या परंतु बनावटी घटना सर्वसामान्य लोकांना समजावून सांगितल्या पाहिजेत. देशाच्या अर्थकारणाशी निगडित असलेल्या अशा गोष्टींचा संबंध थेट सामान्यांशी असतो, असेही ते म्हणाले.

जगाच्या इतिहासात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांचा परिणाम जगातील अर्थकारणावर होत असतो. देशाचा विकास दर (जीडीपी) म्हणजे आकड्यांचाच खेळ आहे. जगातील प्रत्येक देशातील समाज जसा असेल तसाच आकड्यांचा खेळ केला जातो. आजही जगातील अनेक देशांकडे कुत्सित नजरेने पाहीले जाते, खरेतर हिच सर्वात मोठी अफरातफर आहे. त्याची पाळेमुळे अमेरिकेत रुजलेली आहेत. जागतिक बँकेवर असलेले त्यांचे नियंत्रण हे सर्वांसाठीच धोक्याचे आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: नागपूर: खाकी वर्दीतील दाम्पत्याच्या दुभंगलेल्या मनात खाकी वर्दीनेच पेरला आनंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुद्ध म्हणजे व्यापाराचे नियोजन

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील घटनांचा संदर्भ देताना हे युद्ध म्हणजे केवळ व्यवसायाचे नियोजन होते, असे करंजीकर म्हणाले. पहिल्या महायुद्धात अमेरिका कुठेही नव्हती. त्यानंतर १९३० ला तेथे जागतिक महामंदी आली. लोकांच्या रोजच्या जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. युद्धाशी काहीही संबंध नसलेल्या जपानने दुसऱ्या महायुद्धात अमरिकेवर हल्ला केला. या सगळ्या घटनांचा संदर्भ हा केवळ अर्थकारणाशी असून युद्ध म्हणजे व्यापार आहे, असेही ते म्हणाले.